Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले भात पीक जमिनीला टेकले; शेतकऱ्यांमध्ये चिंता


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻

शहापूर तालुका प्रतिनिधी : शंकर गायकवाड


यावर्षी शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना भाताचे पीक चांगल्या प्रमाणात आले होते. परंतु सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतातील भात जमिनीवर टेकले आहे. दरवर्षी दसऱ्यानंतर शेतकरी कापणीस सुरुवात करतात, मात्र यंदा मुसळधार पावसामुळे कापणी उशिरा होणार आहे.



पीक जमिनीवर पडल्याने भात कुजण्याचा व उत्पादनात मोठी घट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकरी म्हणतात की, "आधीच मजुरी, बी-बियाणे, खते, औषधे या सगळ्यावर मोठा खर्च झाला आहे. आता हे पीक हातात येईपर्यंत किती नुकसान होईल याची कल्पनाच नाही. त्यामुळे सोसायटीचे कर्ज सरकारने माफ करावे."


याबाबत स्थानिक कृषी विभागाने नुकसानीचा पंचनामा करून मदत जाहीर करावी, अशीही मागणी होत आहे. पावसाचा जोर कमी न झाल्यास शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.




Post a Comment

0 Comments