Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेतर्फे शहापूर तालुक्यात मोफत वह्या वाटप.

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻

शहापूर तालुका (प्रतिनिधी) – शंकर गायकवाड .


 लोकनेते मा. निलेशजी सांबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेतर्फे शहापूर तालुक्यातील विविध शाळांमध्ये मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.


या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कानडी, शाळा झापवाडी, शाळा वडाचीवाडी, शाळा गांगणवाडी, शाळा बेलकडी, शाळा सावरोली, शाळा खरपत, शाळा नामपाडा व शाळा रिकामवाडी या ठिकाणी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.


मा. निलेशजी सांबरे साहेब यांचे म्हणणे आहे की, “शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये, प्रत्येक विद्यार्थी सुशिक्षित व जबाबदार नागरिक म्हणून घडावा, यासाठी संस्थेतर्फे सातत्याने शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. तसेच कोणताही सर्वसामान्य व्यक्ती उपचारापासून वंचित राहू नये, यासाठी संस्थेचे अनेक दवाखाने कार्यरत आहेत. शहापूर तालुक्यातील आसनगाव येथे नुकताच सर्वांसाठी मोफत दवाखाना सुरू करण्यात आला आहे.” असे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले आहे .


या सामाजिक उपक्रमाला स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.


कार्यक्रमाला मान्यवर म्हणून माननीय काळुरामजी उघडा, रंजना उघडा, चित्राताई सराई, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. सुनील धानके, विठ्ठल केदार, बळीराम गांगड, तानाजी दवणे, गणेश केदार, शंकर गायकवाड, जनार्दन दवणे, दशरथ केदार, मारुती दवणे, सचिन दवणे तसेच गावातील ग्रामस्थ, महिला व शाळेतील शिक्षक उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments