वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
कार्यकारी संपादक : रितेश साबळे
अंबड तालुका, पिठोरी सिरसगाव जालना – शनिवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे गल्हाटी नदिला अचानक आलेल्या पुरामुळे पिठोरी सिरसगाव परिसर पाण्याखाली गेला. या पुरामुळे अनेक घरांचे, शेतीचे आणि अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी माजी सामाजिक न्यायमंत्री आणि प्रख्यात नेते मा. रामदासजी आठवले यांनी दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी तीन वाजता पिठोरी सिरसगाव येथे भेट दिली. त्यांनी पुरग्रस्त भागाची पाहणी करून ग्रामस्थांची विचारपूस केली. तसेच प्रशासनाला तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना व नागरिकांना त्वरित मदत उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.
या वेळी गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यात ग्रामपंचायत सरपंच मा. कृष्णाभाऊ आटोळे, उपसरपंच मा. पांडुरंग उढाण, वंचित बहुजन आघाडीचे अंबड तालुका अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य मा. किशोरभाऊ तुपे, ग्रामसेवक जे. डी. चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य प्रेमानंद उढाण, आप्पासाहेब उढाण, लखन तुपे, भास्कर खरात, भागवत बापू उढाण, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष मा. उमेशभाऊ पाष्टे, माजी सरपंच मा. रामेश्वर माने, मुकेश डूचे तसेच इतर ग्रामस्थांचा समावेश होता.
ग्रामस्थांनी या भेटीबद्दल समाधान व्यक्त करत, प्रशासनाकडून तातडीने मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली.


Post a Comment
0 Comments