वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
रितेश साबळे
(औरंगाबाद) दि. : वैजापूर तालुक्यातील लाख खंडाळा येथील अनिल बाबुराव पवार (वय २९) या तरुणाने धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परसोडा रेल्वे स्थानकाजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल पवार हा परसोडा रेल्वे स्थानकाजवळ असताना नगरसोल-जालना डेमो पॅसेंजर धावत असताना अचानक त्याने रेल्वेसमोर उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील शंकर कवडे यांनी तात्काळ रेल्वे पोलीस व रेल्वे सेनेचे अध्यक्ष संतोष कुमार सोमानी यांना याची माहिती दिली.
पाऊस सुरू असताना रेल्वे पोलीस व रेल्वे सेनेचे अध्यक्ष घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी प्रचंड चिखल असतानाही पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून घाटी रुग्णालयात दाखल केला. डॉक्टरांनी तपासून अनिल पवार यांना मृत घोषित केले.
या कारवाईत पोलिस नाईक बडे, पोलिस कॉन्स्टेबल धायडे, प्रदीप खंडागळे व गोसावी यांनी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान, याप्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. पोलिस तपास करीत आहेत.
या घटनेमुळे अनिल पवार यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


Post a Comment
0 Comments