वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी पंकज चव्हाण.
कुऱ्हाडी –
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुऱ्हाडी येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात गावातील तरुण, सुशिक्षित, समाजप्रिय व शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्त्व आदरणीय सदाशिव भाऊ गणेशराव सरकटे (भावी सरपंच) यांनी शाळेला तब्बल २७,००० रुपयांचा खर्च करून एक वर्ग डिजिटल बनवून दिला तसेच २२,००० रुपयांची अत्याधुनिक साऊंड सिस्टीम भेट दिली.
विद्यार्थ्यांना आनंददायी व प्रभावी शिक्षण मिळावे यासाठी सदाशिव भाऊंनी केलेले हे योगदान अत्यंत कौतुकास्पद ठरले आहे. शाळेच्या मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंदांच्या उपस्थितीत सदाशिव भाऊ यांचा यथोचित सत्कार करून छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली.
शाळेविषयी असलेली त्यांची कर्तव्यनिष्ठ भावना, समाजातील शैक्षणिक प्रगतीसाठी असलेली बांधिलकी आणि गावाला शाळेचा अभिमान वाटावा या भावनेतून त्यांनी केलेले हे योगदान नक्कीच प्रेरणादायी आहे, अशी भावना शिक्षकांनी व्यक्त केली.
गावकऱ्यांनीही या उपक्रमाचे मनापासून स्वागत करून, अशा प्रकारचे सहकार्य पुढेही शाळेला लाभावे अशी अपेक्षा व्यक्त केली.



Post a Comment
0 Comments