वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधीः पंकज चव्हाण.
जिंतूर तालुका – परभणी जिल्ह्यातील येलदरी कॅम्प येथील रहिवासी विजय उत्तमराव उबाळे यांनी येलदरी येथील जलविद्युत निर्मिती प्रकल्प कार्यालयासमोर आजपासून उपोषण सुरू केले आहे.
विजय उबाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील १५ वर्षांपासून याच प्रकल्पात कार्यरत असलेले उपकार्यकारी अभियंता श्री. बी. ए. जामोदकर यांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून धमकावले. याबाबत जिंतूर पोलीस स्टेशन येथे अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये माननीय जिल्हा व सत्र न्यायालयाने जामोदकर यांचा जामीन देखील नाकारला आहे.
तरीही जामोदकर यांच्यावर कोणतीही विभागीय कारवाई न करता त्यांना पाठीशी घालण्यात येत असल्याचा आरोप विजय उबाळे यांनी केला आहे. याच निषेधार्थ त्यांनी आज जलविद्युत निर्मिती प्रकल्प कार्यालय, येलदरी येथे माननीय कार्यकारी अभियंता श्री. उन्मेश पाटील यांच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
या प्रकरणात कार्यकारी अभियंता व प्रकल्पातील जबाबदार अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही उबाळे यांनी केली आहे. तसेच त्यांनी सर्व नागरिकांना आपल्या लढ्यास पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.


Post a Comment
0 Comments