Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

हिवरा जाटू येथील ओढ्यामध्ये आढळला अनोळखी मृतदेह.



वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻

 प्रतिनिधी:-मोहन दिपके.

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा जाटू गावालगत असलेल्या नदीला मिळणाऱ्या ओढ्यात आज सकाळी एक अनोळखी मृतदेह आढळून आला आहे.


सकाळी हिवरा जाटू येथील शेतकरी संतोष शेषराव शिंदे व सूर्यभान वामन शिंदे हे शेतात पाहणीसाठी गेले असता त्यांच्या शेतालगत असलेल्या ओढ्यात हा मृतदेह आढळून आला. त्यांनी तात्काळ ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन याची माहिती दिली.


ग्रामपंचायत सेवक नामदेवराव मस्के यांनी ही घटना संबंधित पोलीस स्टेशन औंढा नागनाथ, तहसील कार्यालय औंढा नागनाथ व तलाठी यांना त्वरित कळविली. माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलीस स्टेशनचे पी.आय. श्री. राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार अमोल चव्हाण, किशोर पारसकर व रविकांत हरकाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन तो शासकीय रुग्णालय औंढा नागनाथ येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.


अद्यापपर्यंत मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पुढील तपास औंढा नागनाथ पोलीस स्टेशनचे पी.आय. श्री. राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.


औंढा नागनाथ पोलीस स्टेशनचे जमादार रविकांत हरकाळ यांनी माहिती देत नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या गावातील कोणी हरवले असल्यास किंवा पाण्यात वाहून गेल्याची शंका असल्यास ओळख पटविण्यासाठी औंढा नागनाथ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.


संपर्कासाठी मोबाईल क्रमांक :

7020940930, 9822615993, 9850888947, 9822277749



Post a Comment

0 Comments