वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
प्रतिनिधी :-मोहन दिपके
दुघाळा – आज दिनांक १७ सप्टेंबर रोजी ७८ वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन दुघाळा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालय दुघाळा आणि पी.एम.श्री. प्राथमिक शाळा दुघाळा येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
सकाळी गावातून शाळेतील मुलांची प्रभातफेरी काढण्यात आली. "मराठवाडा मुक्ती संग्राम दिन चिरायू होवो", "स्वामी रामानंद तीर्थ अमर राहो", "डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमर राहो", "महात्मा गांधी अमर राहो" अशा जयघोषाने संपूर्ण गाव दणाणून गेले.
ग्रामपंचायत कार्यालय येथे गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री. जगदीप वसंतराव दिपके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तर पी.एम.श्री. प्राथमिक शाळा येथे शाळेचे मुख्याध्यापक श्री. खिल्लारे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.
या कार्यक्रमात गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदविला. शाळेच्या व ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व गावकऱ्यांचे आभार मानण्यात आले.



Post a Comment
0 Comments