वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
बुलढाणा जिल्हाप्रमुख : शेख हसण .
खामगाव (जि. बुलढाणा) – दिवसेंदिवस रासायनिक खते व कीटकनाशकांचा अतिवापरामुळे शेती उत्पादनात घट होत असून मानवी आरोग्यावर देखील गंभीर परिणाम होत आहेत. या पार्श्वभूमीवर चितोडा (ता. खामगाव) येथे नवभारत फर्टीलाईजर्स कंपनीतर्फे शेतकरी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात कृषी अधिकारी प्रफुल राठोड आणि किशोर चतारकर तसेच शेतकरी प्रतिनिधी राजिक शेख यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय व जैविक शेतीबाबत मार्गदर्शन केले. रासायनिक खतांचा अतिवापर केल्याने जमिनीचा सुपीकपणा कमी होतो, जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होतो तसेच पिकांच्या गुणवत्तेवर व उत्पादनावर परिणाम होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
श्री. राठोड यांनी सांगितले की खरीप हंगामात विशेषतः सोयाबीन व तुरीवर पडणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी प्रथम जैविक औषधांचा वापर करावा. यामुळे किडींचा प्रादुर्भाव कमी होतो आणि पिकांवरील मित्र कीटक व जमिनीतील सूक्ष्मजीवांना कोणताही अपाय होत नाही.
या कार्यक्रमास गावातील शेतकरी दिलावर खान यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments