वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
कार्यकारी संपादक रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगर — दिनांक : ०९ सप्टेंबर २०२५ येथील आविष्कार कॉलनीत आज सकाळी दुर्दैवी घटना घडली. २२ वर्षीय फार्मसी पदवीधर तरुणी (वय २२, ) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेचा तपशील :
नुकतीच नोकरीसाठी संभाजीनगरला आली होती. ती आविष्कार कॉलनीत भाड्याच्या खोलीत राहत होती आणि स्थानिक कंपनीत कार्यरत होती. ८ सप्टेंबर रोजी ती कामावर गेली नव्हती. शेजाऱ्यांनी तिला जेवणासाठी बोलावण्याचा प्रयत्न केला, मात्र दरवाजा न उघडल्याने त्यांनी खिडकीतून पाहिले असता ती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. तत्काळ पोलिसांना कळविण्यात आले.
सुसाईड नोट व संशय :
घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली. त्यात तिने “मम्मी, दादा, आजी-आजोबा, मला माफ करा” असे लिहिले होते. प्राथमिक तपासात तिच्या मोबाईलवर अज्ञात क्रमांकावरून सलग २५ पेक्षा जास्त वेळा फोन आले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ब्लॅकमेलिंगमुळे आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.
पोलीस तपास :
सिडको पोलिसांनी निकिताचा मोबाईल जप्त करून कॉल रेकॉर्ड्सची तपासणी सुरू केली आहे. अज्ञात व्यक्तीची ओळख पटवून त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कुटुंबीयांची माहिती :
मूळची अहमदनगर जिल्ह्यातील असून तिने अलीकडेच फार्मसी शाखेचे शिक्षण पूर्ण केले होते. नोकरीसाठी ती संभाजीनगर येथे आली होती. तिच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबीय व नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे.


Post a Comment
0 Comments