वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
कार्यकारी संपादक रितेश साबळे
मुंबई – राज्यभर झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखो शेतकरी, शेतमजूर आणि वंचित समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील उभ्या पिकांचे नुकसान होऊन शेतकरी हाताबडाईला आला आहे. शिक्षण, रोजगार, निवारा आणि उपजीविकेचे सर्वच प्रश्न विस्कळीत झाले असून ग्रामीण भागात उपासमारीचे संकट गडद झाले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत *वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून शेतकऱ्यांसाठी तातडीच्या मदतीची मागणी केली आहे.*
आंबेडकर यांनी आपल्या पत्रात सरकारसमोर काही ठोस मागण्या मांडल्या आहेत :
*१ . राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा.*
*२. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी.*
*३. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी.*
*४. पंचनाम्याचे नाटक न करता थेट आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी.*
अद्यापपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने अशा प्रकारची ठोस मागणी केलेली नाही, असेही त्यांनी निदर्शनास आणले. *“शासनाने विलंब न करता निर्णय घ्यावा, अन्यथा लाखो शेतकरी कुटुंब उपासमारीकडे ढकलले जातील,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.*
वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले आहे की, शासनाने जर तातडीने मदत जाहीर केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.


Post a Comment
0 Comments