वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
शहापूर तालुका प्रतिनिधी शंकर गायकवाड
आघई परिसरातील पिवळी ग्रामपंचायत हद्दीतील हेदूचा पाडा वाडीत अखेर प्रथमच विजेचा दिवा प्रज्वलित झाला आहे. दीर्घकाळ अंधारात राहिलेल्या या वाड्यातील ग्रामस्थांना आज प्रकाशाचा आनंद अनुभवता आला.
या वाडीत एकूण २० घरे असून साधारण १०० लोकसंख्या आहे. स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी प्रथमच येथे वीज पोहोचल्याने ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
हा ऐतिहासिक क्षण श्रमजीवी संघटनेच्या अथक परिश्रमामुळे शक्य झाला. अनेक वर्षांपासून ग्रामस्थांनी वीज मिळावी यासाठी सतत पाठपुरावा केला होता. अखेर प्रशासनाने लक्ष घातल्याने हेदूचा पाडा वाडीला अंधारातून मुक्ती मिळाली.
ग्रामस्थांनी श्रमजीवी संघटना तसेच प्रशासनाचे आभार मानले आहेत. गावात वीज आल्यानंतर मुलांच्या शिक्षणाला गती मिळेल तसेच गावाच्या सर्वांगीण विकासालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.



Post a Comment
0 Comments