📰 वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
परभणी : वंचित बहुजन आघाडी तालुका परभणीच्या वतीने तालुका अध्यक्ष कमलेश ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व यशवंत सोनवणे यांच्या अथक परिश्रमातून परभणी उत्तर तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे शाखा स्थापन करण्यात आली. या शाखा स्थापनेनिमित्त जाहीर सभेचे आयोजन उत्तर जिल्हाध्यक्ष तुकाराम भारती यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
या सभेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून दक्षिण विभाग जिल्हाध्यक्ष सुनील मगरे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष सुनीता साळवे, उत्तर युवा जिल्हाध्यक्ष गणेश गाढे, दक्षिण युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड, जिल्हा महासचिव गौतम रणखांबे, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी वाकळे, राजेश गायकवाड व परभणी युवा शहराध्यक्ष प्रमोद कुटे आदी मान्यवर व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
बातमी देणारे ( पंकज चव्हाण )

Post a Comment
0 Comments