वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
परभणी (31 ऑगस्ट) – आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका काही दिवसांत होणार आहेत. जिल्हा परिषदेला ‘मिनी मंत्रालय’ म्हणून संबोधले जाते. शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम जिल्हा परिषद व पंचायत समितीमार्फत होते. या निवडणुकांमध्ये सत्ता मिळविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी प्रयत्नशील असून, त्यासाठी परभणी तालुक्यातील मांडाखळी येथे मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्ष सुनीता साळवे यांनी भूषविले. कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष (उत्तर) तुकाराम भारती, युवा जिल्हाध्यक्ष (उत्तर) गणेश गाढे व तालुकाध्यक्ष प्रमोद अंभोरे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे, तसेच छायाचित्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रत्नमाला गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले. बैठकीचे सूत्रसंचालन काळे यांनी केले.
या मतदार जागृती बैठकीस महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
(न्यूज देणारे *पंकज चव्हाण )


Post a Comment
0 Comments