वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
मलकापूर (प्रतिनिधी शेख हसन):
भारतीय बौद्ध महासभा शहर शाखेची पुनर्गठण सभा नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेमध्ये वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांनी मार्गदर्शन करत विचार मांडले तसेच नवनिर्वाचित शहराध्यक्ष एस. डी. झनके सर आणि कार्यकारिणी सदस्यांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी सभेचे अध्यक्ष तालुकाध्यक्ष जी. एन. इंगळे, निवड समितीचे जिल्हाध्यक्ष के. के. शेगोकार, जिल्हा सरचिटणीस बी. एन. सुरवाडे, जिल्हा कोषाध्यक्ष धम्मपाल वाघ, जिल्हा संस्कार सचिव एम. एस. वाघ, जिल्हा संघटक अमोल मेढे, जिल्हा महिला सरचिटणीस पद्मनाताई तायडे, जिल्हा उपाध्यक्ष शेषराव तायडे, तालुका सरचिटणीस एस. बी. निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
या पुनर्गठण सभेमध्ये कार्यकारिणीची नवीन टीम जाहीर करण्यात आली असून उपस्थित सर्व मान्यवरांनी नव्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी उत्साह वाढविला.

Post a Comment
0 Comments