Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

रेल्वेतून उतरताना प्रवासी घसरला आणि रेल्वेखाली अडकला; गॅस कटरच्या सहाय्याने प्रवाशाची सुटका; अकोल्यात दीड तासांच्या थरारानंतर प्रवाशांनी सोडला सुटकेचा निश्वास.



 वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻

*अकोला-* रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेला हादरवणारी धक्कादायक घटना सोमवारी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर रेल्वे जंक्शन येथे घडली. पुणे-अमरावती या गाडीतून प्रवास करणारा अकोल्यातील मुस्ताक खान हा प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर उतरतानाच घसरला आणि थेट गाडीखाली अडकला.


क्षणभरातच भीषण परिस्थिती निर्माण झाली. जखमी प्रवासी एवढा घट्ट अडकला होता की त्याला बाहेर काढणे अशक्यप्राय ठरत होते. तत्काळ रेल्वे पोलिसांनी जय गजानन आपत्कालीन पथकाला पाचारण केले. या पथकाने गॅस कटरच्या सहाय्याने गाडीचे पायदान कापून अडकलेल्या प्रवाशाची सुटका केली. सुटकेच्या या प्रयत्नादरम्यान प्रवाशांचा श्वास रोखला गेला होता. पथकाच्या तत्परतेमुळे मुस्ताक खानचा जीव वाचवण्यात यश आले. 


या अपघातात प्रवाशाच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. त्याला तातडीने श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पुणे–अमरावती गाडी तब्बल 1 तास 20 मिनिटे प्लॅटफॉर्मवर उभी राहिली. अचानक गाडी थांबल्याने प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. या अपघातानंतर रेल्वे सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्थानिक प्रवाशांतूनही या घटनेमुळे मोठी चिंता व्यक्त होत आहे.



Post a Comment

0 Comments