Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

*बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाची निर्घुण हत्या; भरचौकात चाकूने केले सपासप वार; घटनेने बीड हादरले*


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻

*बीड-* बीडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. माने कॉम्प्लेक्ससारख्या कायम गजबजलेल्या परिसरात यश देवेंद्र ढाका (वय-२२) या तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. यश हा स्थानिक वर्तमानपत्राचे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा असून अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास वर्दळीच्या ठिकाणी धारदार चाकूने त्याच्या छातीत वार करण्यात आला. या वारांमुळे तो रक्तबंबाळ झाला आणि गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे बीड शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.


यश हा 22 वर्षाचा तरुण अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. स्थानिक वर्तमानपत्राचे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा तो मुलगा. वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या तरुणाच्या हत्येने बीड पुन्हा हादरले असून या घटनेने जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून घटनास्थळी पोलिसांची टीम पंचनामा करत आहे. यश ढाका हा तरुण बीडमधील स्थानिक वर्तमानपत्राचे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा आहे. दरम्यान या घटनेने बीड शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, शहरात काल (गुरुवारी, ता २५) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास यश देवेंद्र ढाका (वय २२, रा. बीड) या तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात आल्याची घटना माने कॉम्प्लेक्स परिसरात घडली आहे. छातीत झालेले दोन वार आरपार गेल्याने यश ढाका रक्तबंबाळ झाला होता. जखमी अवस्थेत त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. यश हा अभियांत्रिकीचे (इंजिनीअरिंगचे) शिक्षण घेत होता. वाढदिवस साजरा करताना वाद झाल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले.



Tags

Post a Comment

0 Comments