वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
शहापूर तालुका प्रतिनिधी : शंकर गायकवाड .
राज्य शासनाच्या सेवा पंधरवाडा अभियानांतर्गत महसूल विभाग व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रुप ग्रामपंचायत नडगाव नांदगाव आदिती डोंगरी ची वाडी नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
हा उपक्रम स्वातंत्र्य संग्रामातील आद्य क्रांतिकारक हुतात्मा नाग्या कातकरी यांच्या बलिदान दिनानिमित्त तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त डोंगरीची वाडी येथे आयोजित करण्यात आला होता. या शिबिरामध्ये शिधापत्रिका, उत्पन्नाचे दाखले, जात दाखले, रहिवासी दाखले तसेच अन्य महत्त्वाचे दाखले नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले.
तालुक्यापासून तब्बल 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरीची वाडी सारख्या दुर्गम भागात थेट ग्रामस्थांच्या दारातच शासनाचे दाखले मिळत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. महसूल विभाग व वन विभागाने ग्रामीण वाड्या–पाड्यांपर्यंत सेवा पोहचविल्याबद्दल स्थानिकांनी मनःपूर्वक आभार मानले.
या उपक्रमामुळे गावातील शेतकरी, विद्यार्थी व सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, शासनाचे दाखले मिळवण्यासाठी वारंवार तालुक्याच्या गावी जावे लागत नाही, याचा सर्व रहिवाशांना मोठा आनंद झाला आहे.


Post a Comment
0 Comments