Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

कुऱ्हाडी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम.


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज.

 परभणी जिल्हा प्रतिनिधी पंकज चव्हाण

कुऱ्हाडी – मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कुऱ्हाडी जिल्हा परिषद शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस गटविकास अधिकारी मानकर साहेब, शाळेचे मुख्याध्यापक राठोड सर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.


या अभियानाअंतर्गत १७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत पंधरवड्याचा कार्यक्रम राबविण्यात येणार असून, सुशासनयुक्त पंचायत, गावातील संस्था समीकरण, लोकसहभाग व श्रमदानाच्या माध्यमातून लोकचळवळ निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. उपजीवन विकास, सामाजिक न्याय आणि पर्यावरण संवर्धन या उद्देशाने ग्रामपंचायतीत वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेण्यात आला.


या वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन गटविकास अधिकारी मानकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख उपस्थितीत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नंदकुमार, ग्रामपंचायत अधिकारी साळवे साहेब, सरपंच रामकोर गोविंद राठोड, पोलिस पाटील बंडू चव्हाण, शाळेचे मुख्याध्यापक राठोड सर, हाके सर, चौधरी मॅडम, अंगणवाडी सेविका राठोड मॅडम तसेच गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.


या उपक्रमामुळे गावात पर्यावरण संवर्धनाबरोबरच लोकसहभागातून ग्रामविकासाला चालना मिळणार असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.



Post a Comment

0 Comments