वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
{संपादकीय}
धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून कळंब शहरातील बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील हवामानाबाबत गंभीर इशारा दिला आहे. 26 ते 29 सप्टेंबर या कालावधीत कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरील जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विशेषतः रायगड आणि पुणे घाटमाथा या भागांसाठी 28 सप्टेंबर रोजी रेड अलर्ट जाहीर आहे. ठाणे, मुंबई आणि रत्नागिरीतही 27 व 28 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने प्रशासनाकडून सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागानुसार, पुढील 72 तास मुंबई, पुणे आणि कोकण विभागासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता असून, दसऱ्यानंतरही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.


Post a Comment
0 Comments