वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
शहापूर तालुका प्रतिनिधी : शंकरजी गायकवाड
कल्याण, – राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेतर्फे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली, राज्य सचिव विनोद काळे यांच्या सूचनेनुसार आणि कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष (पँथर) आनंद नवसागरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने तहसीलदार सचिन गुंजाळ यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून घरांचे नुकसान, जनावरांचा मृत्यू आणि जीवितहानीही झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. सरकारने पंचनामे करून तातडीने मदत न दिल्यास येत्या काही दिवसांत तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही रिपब्लिकन सेनेने दिला आहे.
या प्रसंगी अलकाताई जगताप (ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष), सुप्रिया तांबे (ठाणे जिल्हा सचिव), ललिताताई आखाडे (कल्याण-डोंबिवली शहर महिला जिल्हाध्यक्ष), रेखाताई गोडबोले (कल्याण शहर महिला अध्यक्ष), मनिषाताई केदार (डोंबिवली शहर महिला अध्यक्ष), बाबूशेठ तलाठी (कल्याण पूर्व अध्यक्ष), ऍड. महेंद्र निकम (उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष), हिरालाल केदार (जेष्ठ समाजसेवक), सुरेश पंडित (कल्याण पूर्व सचिव), सुंदर काऊतकर (कल्याण शहर उपाध्यक्ष) आदी मान्यवर उपस्थित होते.
कल्याण शहराध्यक्ष दामू काऊतकर यांच्या पुढाकाराने ही मागणी करण्यात आली. या वेळी पोलिस प्रशासनाकडून कल्याण सीआयडी ब्रँचचे श्री. आडावले व स्पेशियल ब्रँचचे पी.एस.आय. रघुनाथ आतपाडकर उपस्थित होते. तहसीलदार सचिन गुंजाळ यांनी ही मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत तत्काळ पोहोचविण्याचे आश्वासन दिले.


Post a Comment
0 Comments