Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

बजाज नगरमध्ये गोळीबार : पिस्तुल निकामी पडल्याने चाकूने हल्ला, युवक गंभीर जखमी


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻

कार्यकारी संपादक : रितेश साबळे

छत्रपती संभाजीनगर (दि.२७ सप्टेंबर) : शहरातील बजाज नगर परिसरात काल रात्री उशिरा धक्कादायक घटना घडली. भोळानाथ शंकरराव कदम (वय ३५) या युवकावर अज्ञात इसमांनी गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पिस्तुलाचे मॅगझिन खाली पडल्याने गोळी सुटली नाही. त्यानंतर हल्लेखोरांनी कदम यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले.


ही घटना बजाज नगर चौक, महाराणा प्रताप चौक येथे घडली. हल्लेखोर स्कॉर्पिओ जीपमधून आले होते. त्यांनी कदम यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला; परंतु पिस्तुल निकामी पडल्याने त्यांनी चाकूचा वापर करून हल्ला केला. या हल्ल्यात कदम गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMCH) येथे उपचार सुरू आहेत.


घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेतली. पोलिसांना तेथे पिस्तुलाचे मॅगझिन व जिवंत काडतुसे मिळून आली आहेत. सध्या पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज जप्त केले असून आरोपींचा शोध वेगाने सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.



Post a Comment

0 Comments