वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
शहापूर
केंद्र कॉलेज नाशिक येथे एस एन डी टी वुमन्स युनिव्हर्सिटी आयोजित(ता.)२७ सप्टेंबर युथ फेस्टिवल २०२५मध्ये वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण २७ महाविद्यालयांनी आपला सहभाग नोंदवला होता.
शहापूर डॉ.भगवान प्रधान वूमन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भगवान प्रधान सर यांच्या मार्गदर्शनातून वेगवेगळ्या स्पर्धेत विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदवला होता, त्यापैकी पथनाट्य स्पर्धेत महिला सुरक्षा व स्वयंसंरक्षण या विषयावर आधारित एकूण २७ महाविद्यालयातून आपल्या शहापूरचा डॉ.भगवान वूमन्स कॉलेजने प्रथम क्रमांक पटकावला,
या पथनाट्याचे लिखाण व दिग्दर्शन कृणाल जाधव यांनी केले तर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून राहुल घायवट यांनी कामगिरी पार पाडली ,तसेच प्राची गांगुर्डे ,भाविका विशे ,जान्हवी डोंगरे ,जयश्री अंदाडे ,सायली भागडे ,मोहीनी वानखेडे ,वेदिका कडव ,दिव्या परटोले इत्यादी मुलींनी स्पर्धेत सहभाग घेतला होता,तसेच रांगोळी स्पर्धेत मोहिनी वानखेडे हिने द्वितीय क्रमांक पटकावला,येत्या दिनांक 5 ऑक्टोंबर ला मुंबई येथे पुढील अंतिम साठी दोन्ही स्पर्धेचे कलाकार जाणार आहेत त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.


Post a Comment
0 Comments