वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
*सोशल मीडिया संपादक मोहनजी दिपके*
(हिंगोली) —
दिवाळी हा आनंदाचा आणि प्रकाशाचा सण असला तरी काही घरांमध्ये मात्र हा सण अंधारात हरवून जातो. कारण त्या घरांवर निराधारपणाचे, दु:खाचे सावट असते. अशा कुटुंबांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंदाचे तेज फुलवण्यासाठी गेल्या अकरा वर्षांपासून मीरा कदम आणि धनराज कदम आत्महत्याग्रस्त, निराधार व दिव्यांग कुटुंबांमध्ये दिवाळी साजरी करत आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही सेवासदन परिवार व साथ फाउंडेशन यांच्या वतीने ही दिवाळी अत्यंत प्रेमळ वातावरणात साजरी करण्यात आली.
दिवाळी सुरू होण्याच्या आदल्या दिवशी सेवासदन वसतिगृहात सर्व महिला भगिनींना सस्नेहभोजन देण्यात आले. त्यानंतर साडी-चोळी आणि फराळाचे वाटप करण्यात आले.
ही दिवाळी लोकसहभागातून साजरी झाल्याने धनराज कदम यांनी सर्व मदतकर्त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमादरम्यान महिलांच्या चेहऱ्यावर माहेरपणाच्या आनंदाची झळक दिसून येत होती.
मीरा कदम यांनी सर्व भगिनींशी सुसंवाद साधत म्हटले —
> “कोणत्याही संकटात घाबरायचं नाही. प्रत्येक संकटाला हिमतीने सामोरं जायचं. तुमच्या सुख-दु:खात आम्ही कायमसोबत आहोत.”
महिलांनीही भावनिक स्वरात प्रतिक्रिया देत सांगितले —
> “ताई, आम्हाला तुमचा खूप आधार वाटतो.”
या कार्यक्रमासाठी हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. कृष्णजी कोकाटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी महिलांना मार्गदर्शन करत प्रेरणादायी विचार मांडले. तसेच विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या सेवासदनमधील विद्यार्थ्यांचा सत्कारही त्यांच्या हस्ते करण्यात आला.
सेवासदनमधील मुलांमध्ये सामाजिक कार्याची भावना रुजावी, या उद्देशाने मीरा कदम आणि धनराज कदम त्यांना प्रत्येक उपक्रमात सक्रियपणे सहभागी करून घेतात. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, निराधार कुटुंब आणि दिव्यांग कुटुंबांमध्ये दिवाळी साजरी करण्याच्या प्रत्येक टप्प्यावर या मुलांनी प्रेमाने मदत केली.
या भावनिक उपक्रमास साथ फाउंडेशनचे अध्यक्ष व सेवासदन परिवाराचे संचालक धनराज कदम, मीरा कदम, सतीश लोहिया, शिवाजी कऱ्हाळे, जनार्दन वाघमारे, लक्ष्मण तांबिले, माधव पठाडे, विलास कोल्हाळ, विजय गायकवाड तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील व दिव्यांग कुटुंबातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.





Post a Comment
0 Comments