वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
शंकर गायकवाड
शहापूर (ठाणे) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध सामाजिक संस्था वेळोवेळी पुढाकार घेत असतात. याच सामाजिक बांधिलकीतून जिजाऊ सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने डोळखांब (ता. शहापूर, जि. ठाणे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक आगळा-वेगळा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधनांची कमतरता जाणवू नये म्हणून सामाजिक कार्यकर्ते विलास दादा घनघाव यांच्या हस्ते पेन वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर रांजणे यांनी केले होते. या वेळी शाळा समिती अध्यक्षा सुनिता प्रभाकर रांजणे, पंचरतना महिला बचत गट तसेच सिद्धीविनायक बचत गटाच्या अध्यक्षा, सचिव व सदस्य उपस्थित होत्या. शाळेचे मुख्याध्यापिका तसेच शिक्षकवृंदही या उपक्रमात सहभागी झाले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटली. शैक्षणिक वाटचालीत अशा स्वरूपाचे सहकार्य लाभल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी अधिक आत्मविश्वासाने शिक्षण घेऊ शकतील, असा विश्वास शाळा प्रशासनाने व्यक्त केला.



Post a Comment
0 Comments