वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज👍🏻
कार्यकारी संपादक रितेश साबळे
घनसावंगी (जालना) :
तालुक्यातील जांब समर्थ येथे माजी आमदार राजेश टोपे यांच्या गटातील सरपंचाकडून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना राजकीय द्वेषातून घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची अडवणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित सरपंच व ग्रामसेवकांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
हे निवेदन मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले.
दरम्यान, घरकुल योजनेतील लाभार्थी सतिश पटेकर व येसाजी गनकवार यांनी ३० सप्टेंबर २०२५ पासून जांब समर्थ येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. संबंधित लाभार्थ्यांच्या उपोषणाची दखल न घेतल्यास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना घेराव घालून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.
या निवेदनावर मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, जिल्हा कार्याध्यक्ष प्रमेश्वर खरात, श्रीरत्न लक्ष्मण पटेकर, सिताराम तुकाराम गनकवार, रामदास उत्तम गनकवार व शिवाजी लक्ष्मण पटेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Post a Comment
0 Comments