वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
शहापूर तालुका प्रतिनिधी :शंकरजी गायकवाड
कसारा, दि. 09 ऑक्टोबर 2025 —
ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन, कल्याण–कसारा शाखेच्या वतीने आज दुपारी 12.00 वाजता बँक ऑफ महाराष्ट्र, कसारा शाखेत सेवानिवृत्त रेल्वे कामगारांच्या विविध अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी बँक शाखा अध्यक्षांना भेट देऊन कामगारांना येणाऱ्या निवृत्तीवेतनाशी संबंधित अडचणी, व्यवहारातील विलंब, तसेच खाते तपासणी प्रक्रियेमध्ये येणाऱ्या तांत्रिक समस्यांविषयी सविस्तर चर्चा केली. तसेच, या समस्या लवकरात लवकर दूर करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याचे आश्वासनही बँक अधिकाऱ्यांनी दिले.
या प्रसंगी काॅ. आनंदा भालेराव (मुंबई मंडळ सचिव), काॅ. प्रल्हाद खंदारे (अध्यक्ष, कल्याण–कसारा शाखा), काॅ. दिलीप शिंदे (ऑर्गनाइजिंग सेक्रेटरी), काॅ. कमलाकर पराड (सदस्य), काॅ. गुलाब शिंदे (उपाध्यक्ष), काॅ. अशोक सोनावने (खजिनदार) आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत उपस्थित सर्वांनी एकमुखाने निर्णय घेतला की सेवानिवृत्त कामगारांचे हित जपण्यासाठी आणि त्यांना प्रशासन, बँका व विभागांकडून योग्य तो न्याय मिळावा, यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतील.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व सदस्यांनी “काॅ. वेणु पी. नायर महामंत्री जीके लाल, एनआरएमयू जिंदाबाद! ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन जिंदाबाद!” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.


Post a Comment
0 Comments