Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

हिंगोलीत मा. सुजातदादा आंबेडकर यांच्या सभेच्या नियोजनासाठी वंचित बहुजन आघाडी कळमनुरी तालुक्याची बैठक उत्साहात पार!


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️

सोशल मीडिया संपादक : मोहनजी दिपके

कळमनुरी (जि. हिंगोली) — आगामी 28 ऑक्टोबर 2025 रोजी हिंगोली येथे होणाऱ्या मा. सुजातदादा आंबेडकर यांच्या जाहीर सभा व पक्षप्रवेश मेळाव्याच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी कळमनुरी तालुक्याच्या वतीने बैठक कळमनुरी येथील शासकीय विश्रामगृहात उत्साहात पार पडली.


या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 2025 (जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका) लक्षात घेऊन संघटन बळकटीकरण आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. हिंगोलीत होणाऱ्या या महत्त्वाच्या सभेसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, यासाठी आजपासूनच संघटनात्मक तयारीला सुरूवात करण्याचा निर्धार तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.


सदरील बैठक कळमनुरी तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीचे सूत्रसंचालन समाधान पाईकराव यांनी केले.


या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून

राजू कांबळे (ता. अध्यक्ष), शिवाजी भूतनर (ता. उपाध्यक्ष, सावंगी भू.), शकील पठाण (शा. अ. कळमनुरी), संतोष इंगोले (यु. ता. महासचिव), यशवंत नरवाडे (ता. स. कांडली), बापूराव महाजन (स. प्र. वारंगा फा.), आनंद पाईकराव (श. महासचिव), जितेश कदम (श. सचिव), नागसेन वाढवे (श. संघटक), काशिनाथ साळवे (ज्येष्ठ कार्यकर्ते), मुकिंदा ढेपे (आडा), विनोद ढेपे (शा. अ. आडा), नथुराम खंदारे (ज्येष्ठ कार्यकर्ते, बऊर), गोविंद पाईकराव (शा. अ. वाकोडी), सुनिल खंडागळे (ता. स. वाकोडी), सिद्धार्थ बलखंडे (ज्येष्ठ कार्यकर्ते, रुपूर), दिनेश पाईकराव (श. सहसचिव), आकाश पाईकराव (कार्यकर्ते, सावंगी भू.), भगवान ढेपे (ज्येष्ठ कार्यकर्ते, आडा), गौतम खंदारे (ग्रा. पं. स. बऊर), मोहम्मद अस्लम (युवा कार्यकर्ते), किशन पाईकराव (वाकोडी), गौतम खंदारे (तरोडा), अमोल पुंडगे (कळमनुरी), विजय जोंधळे (ता. स. तरोडा), गंगाराम मिटकर (साळवा), दादाराव खंदारे (श. सचिव, बऊर), अमोल खंदारे (श. अ. बऊर), मुकिंदा भाऊराव ढेपे (आडा), राहुल लेंबाळे (कार्यकर्ते) आदींसह समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



या बैठकीत उपस्थित सर्वांनी “हिंगोली येथील सभा भव्य, अनुशासित आणि यशस्वी व्हावी” यासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार केला.


वंचित बहुजन आघाडी, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली!



Post a Comment

0 Comments