वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
शहापूर तालुका प्रतिनिधी शंकरजी गायकवाड
कल्याण, दि. 12 ऑक्टोबर (प्रतिनिधी) —
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्ष संघटन वाढवण्याच्या आदेशानुसार, कल्याण-डोंबिवली जिल्हा अध्यक्ष विशाल पावशे यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा महासचिव जी. एन. गवई, युवा नेत्या अश्विनीताई धुमाळ तसेच जिल्हा कार्यकारिणीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला.
या कार्यक्रमात विविध विभागातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून संघटनेला बळ दिले. या प्रसंगी काहींना वार्ड तसेच जिल्हा कार्यकारिणीत महत्त्वाची पदे बहाल करण्यात आली.
त्यात कल्याण पश्चिमचे माजी शहराध्यक्ष संतोष गायकवाड यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून, सुनील कांबळे आणि एकनाथ साळवे यांची जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून, तर बाबासाहेब ढाले यांची डोंबिवली पूर्व संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच अर्जुन यादव यांची जिल्हा संघटक म्हणून निवड करण्यात आली.
या पक्षप्रवेशामुळे वंचित बहुजन आघाडीच्या संघटनेला कल्याण-डोंबिवली परिसरात नवी ऊर्जा प्राप्त झाली असून आगामी काळात पक्ष अधिक जोमाने कार्य करणार असल्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.



Post a Comment
0 Comments