वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
शहापूर तालुका प्रतिनिधी शंकरजी गायकवाड
वासिंद (ता. शहापूर) : आज दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता वासिंद रेल्वे स्टेशन येथील ओ.एच.ई. डेपोमध्ये सेवानिवृत्त कामगारांच्या विविध समस्यांबाबत युनियनची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस ४० ते ५० सेवानिवृत्त कामगार उपस्थित होते.
बैठकीत फॅमिली पेन्शन, फॅमिली पास, बँकेत येणाऱ्या अडचणी, रेल्वे दवाखान्यात होणारा त्रास अशा अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी मार्गदर्शक म्हणून काॅ. जे. एन. पाटील (अध्यक्ष, मुंबई मंडळ), काॅ. अरुण मनोरे (कार्यकारी अध्यक्ष, मुंबई मंडळ), काॅ. वसंत कासार (ऑर्गनायझिंग सेक्रेटरी, मुंबई मंडळ), काॅ. आर. पी. सिंह (उपाध्यक्ष, मुंबई मंडळ), काॅ. आनंदा भालेराव (सचिव, मुंबई मंडळ), काॅ. अहमद खान (सचिव, इगतपुरी शाखा), काॅ. आनंदा समुद्रे (कार्यकारी अध्यक्ष, कल्याण–कसारा शाखा) आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत काॅ. प्रल्हाद खंदारे (अध्यक्ष, कल्याण–कसारा शाखा), काॅ. दिलीप वेंखडे (सेक्रेटरी), काॅ. दिलीप शिंदे (ऑर्गनायझिंग सेक्रेटरी), काॅ. कमलाकर पराड (उपाध्यक्ष), काॅ. गुलाब शिंदे (उपाध्यक्ष), काॅ. भगवान पंडित (सदस्य), काॅ. काशीनाथ खंदारे (सदस्य) यांनीही सहभाग नोंदवला.
बैठकीच्या शेवटी काॅ. नंदु बोंडवे (वरिष्ठ नेता, वासिंद) यांनी उपस्थित सर्व मान्यवर आणि समुदायाचे आभार मानले. तसेच काॅ. वेणु पी. नायर (महामंत्री) यांच्या नेतृत्वात “जीके लाल सलाम!”, “एन.आर.एम.यु. जिंदाबाद!”, “ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेअर फेडरेशन जिंदाबाद!” अशा घोषणांनी उत्साही वातावरणात मिटिंगची सांगता करण्यात आली.
कामगारांसोबतही आणि सेवानिवृत्तीनंतरही — आमची युनियन सोबत आहे!



Post a Comment
0 Comments