वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
कार्यकारी संपादक : रितेश साबळे
बिहार : बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात यावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचा संघर्ष अखंड सुरूच राहील, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, “नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी हे दोघेही बिहारमध्ये महिन्यांपासून निवडणूक प्रचारात गुंतलेले आहेत. मत मिळवण्यासाठी सभा, मेळावे घेत आहेत, मोठमोठी आश्वासने देत आहेत. मात्र, महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी आंदोलन करणाऱ्या बौद्ध भिक्षूंच्या समर्थनार्थ आजवर एक शब्दही उच्चारलेला नाही. ही शांतता अज्ञानातून नाही, तर जाणूनबुजून ठेवलेली आहे. हेच दाखवते की बौद्धांची आवाज आणि धार्मिक न्याय यांना नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या दृष्टीने काहीच महत्त्व नाही.”
ते पुढे म्हणाले, “मंदिरांमध्ये फोटोसेशन करायचे असेल तर हे दोन्ही नेते सर्वांत पुढे दिसतात. पण जगातील सर्वात पवित्र बौद्ध स्थळाच्या न्याय्य व्यवस्थापनाची मागणी भिक्षूंनी केली की मात्र हे दोघेही मौन बाळगतात. हेच आहे मोदी आणि राहुल गांधी यांचे बौद्धांविषयीचे खरे चेहरे.”
शेवटी ॲड. आंबेडकर म्हणाले, “जोपर्यंत बोधगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीची लढाई सुरूच राहील.”



Post a Comment
0 Comments