Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

🟦 उल्हासनगर महापालिकेचा बोनस जाहीर – कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लहर!

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️

उल्हासनगर :-

उल्हासनगर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात झालेल्या बैठकीत रु. १८,०००/- बोनस जाहीर करण्यात आला असून, या निर्णयाने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


ही बैठक महापालिका प्रशासक तथा आयुक्त श्रीमती मनिषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बैठकीस अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष शचरणसिंह टांक, लेबर फ्रंट संघटनेचे श्याम गायकवाड आणि दीपक दाभणे, भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राधाकृष्ण साठे, तसेच मनसे युनियनचे अध्यक्ष दिलीप थोरात उपस्थित होते.


सर्व युनियन प्रतिनिधींनी एकमताने बोनस रकमेबाबत संमती दर्शवली असून, कर्मचाऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी प्रशासक तथा आयुक्त यांचे मनःपूर्वक आभार मानले.


या बैठकीला अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, उपआयुक्त (मुख्यालय) दीपाली चोगले, मुख्य लेखाधिकारी किरण भिलारे, सहायक आयुक्त (साप्रवि) सलोनो निवकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments