वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
कार्यकारी संपादक रितेश साबळे
*सुजात दादा आंबेडकर : “वंचितांचा हक्क मिळेपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही”*
नांदुरा (जि. बुलढाणा) : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदुरा तालुक्यातील विविध सामाजिक घटकांना एकत्र आणत “जाहीर संकल्प मेळावा” भव्य प्रमाणात पार पडला. या मेळाव्याला युवांचे प्रेरणास्थान आणि आघाडीचे युवा नेते सुजात दादा आंबेडकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या वेळी त्यांनी आपल्या प्रभावी भाषणातून सामाजिक न्याय, शिक्षण, रोजगार, वंचितांचा विकास आणि स्वाभिमान या विषयांवर ठोस भूमिका मांडली.
*मेळाव्याचे अध्यक्षस्थान मा. अनिलभाऊ धुंदके (ता. अध्यक्ष, व. भ. आ. नांदुरा) यांनी भूषविले.* *प्रमुख उपस्थिती मा. देवानंद हिवराळे (जि. अध्यक्ष, बुलढाणा) यांची होती.* तसेच विविध तालुकास्तरीय व विभागीय पदाधिकारी, महिला नेते, युवा कार्यकर्ते, आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
“ *भाजपसोबत कोणतीही युती नाही – स्वतंत्र लढा देऊ”*
या मेळाव्यात सुजात दादा आंबेडकर यांनी ठाम शब्दांत जाहीर केले की, “वंचित बहुजन आघाडीचा उद्देश सत्तेसाठी नव्हे तर वंचितांच्या हक्कांसाठी आहे. आम्ही अन्यायाविरुद्ध लढतो आणि तोपर्यंत लढत राहू. *कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत युती होणार नाही, आम्ही स्वतंत्र लढा देऊ* .”
त्यांनी पुढे म्हटले की, “ज्या समाजाने शतकानुशतके अन्याय सहन केला, त्या समाजाला आता सत्ता, शिक्षण आणि रोजगारात समान वाटा मिळायलाच हवा. फक्त घोषणा नव्हे, तर कृतीतून बदल घडवणे हे आमचे ध्येय आहे.”
महिलांचा आणि युवकांचा सहभाग अधोरेखित
*सुजात आंबेडकर यांनी युवकांना उद्देशून म्हटले, “आपणच समाजाचे परिवर्तनकर्ते आहात.* महिलांच्या नेतृत्वाशिवाय कोणतेही आंदोलन यशस्वी होत नाही. त्यामुळे प्रत्येक युवक आणि महिला संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी पुढे आली पाहिजे.”
या मेळाव्यात महिलांचे व युवकांचे मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. अनेकांनी आघाडीच्या सदस्यत्व अभियानात सहभागी होण्याची नोंद केली.
*समाजातील ऐक्याचा संदेश*
मेळाव्यात आंबेडकरी, बहुजन, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम तसेच सर्व वंचित समाज घटकांनी एकजुटीने उपस्थित राहून समाजातील ऐक्याचा संदेश दिला. सुजात दादांनी या ऐक्याचे कौतुक करत म्हटले की, “जोपर्यंत आपण विभागलेले आहोत, तोपर्यंत सत्ताधारी आपल्यावर राज्य करणार. पण जर आपण एकत्र आलो, तर सत्तेवर आपला हक्क असेल.”
*उपस्थित मान्यवर व आयोजन*
या कार्यक्रमाचे आयोजन अजयभाऊ गांधी (ता. महासचिव), संदीप ठाकरे (ता. सचिव), गजाजन वाघ (ता. उपाध्यक्ष) यांनी केले.
कार्यक्रमाचे संयोजन प्रवीण मंमगुटे (जाहिरात प्रमुख) यांनी केले.
कार्यक्रमात मा. अशोकभाऊ सोळंके, मा. नानाभाऊ काळकर, मा. नामदेव गायकवाड, मा. संजय लहाने आदींसह तालुका व जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
मेळावा अत्यंत अनुशासित पद्धतीने पार पडला. उपस्थित नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीच्या ध्येयधोरणांना मोठा प्रतिसाद दिला.




Post a Comment
0 Comments