वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
कार्यकारी संपादक रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगर (दि. 16 ऑक्टोबर 2025) –
भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर “गुलाम आणि इंग्रजांचे एजंट” अशी निंदनीय वक्तव्ये करणाऱ्या मनुवादी पाखंडी अनिल मिश्रा या वकिलाच्या वक्तव्यामुळे देशभरातील बहुजन जनतेच्या भावना तीव्रपणे दुखावल्या आहेत. या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध म्हणून आज रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे जोरदार आंदोलन करण्यात आले.
आकाशवाणी चौकात झालेल्या या आंदोलनात पाखंडी अनिल मिश्रा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला भरचौकात फाशी देण्यात आली आणि त्याच्या छायाचित्राला जोडे मारून संतप्त निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे जिल्हा अध्यक्ष दिनेश गवळे आणि युवा शहराध्यक्ष अर्शद लखपती यांनी केले. पक्ष प्रमुख राजूभाई साबळे आणि राज्य उपाध्यक्ष अॅड. अविनाश थिट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन पार पडले.
यावेळी कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे मागणी केली की, पाखंडी मानसिक विकृती असलेल्या अनिल मिश्रा याच्यावर तातडीने देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच बार कौन्सिलने त्यांचा वकिलीचा परवाना त्वरित रद्द करावा. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी विटंबनात्मक पोस्ट आणि व्हिडिओज शेअर करणाऱ्या फेक अकाऊंट धारकांवर सायबर गुन्हे शाखेने SC/ST ॲक्टनुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.
तसेच, अहिल्यानगर (अहमदनगर) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी दिलेल्या “दिवाळीत हिंदूंच्याच दुकानातून खरेदी करा” या चिथावणीखोर वक्तव्याचा देखील तीव्र निषेध करण्यात आला. त्यांच्याही छायाचित्राला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी पोलिस अधिकारी उपस्थित राहून आंदोलन शांततेत पार पाडण्यात आले. नंतर पोलिसांच्या माध्यमातून पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनात मराठवाडा उपाध्यक्ष सुनिल खरात, मराठवाडा उपनेते जयनाथ बोर्डे, शहराध्यक्ष रणजीत मनोरे, मध्य शहराध्यक्ष संतोष जाधव, प्रकाश घोरपडे, राजकुमार अमोलिक, अरुणा साठे, कल्पना जमधडे, मालती आव्हाड, प्रदीप धनेधर, शेख जहीर, अशोक शिरसाठ, हन्नू दादा, अनिस गंगापुरकर, ज्ञानेश्वर वाघ, सागर जाधव, गणेश गौरये, आसिफ सेठ, अफजल लाला, जे. के. शाकेर, मुकेश मकासरे, शाहिद लखपती, जहीर भाई, कडूबा म्हस्के, विजय सदावर्ते, अनिल कांबळे, आकाश जाधव, विशाल बनकर, इस्माईल अप्पा, अमजद खान, शहजाद भाई, राज लखपती, अनिल दिवेकर, अन्सार भाई, कलीम पटेल, रऊफ भाई, सोहेल भाई, पप्पूभाऊ, गणेश भाऊ, आवेस भाई आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments