वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
ठाणे जिल्हा प्रतिनिधी : मनोहरजी गायकवाड .
मुरबाड : आंबेडकरी चळवळीत सक्रिय सहभाग, प्रशासनाचा सखोल अभ्यास आणि गोर-गरीब तसेच वंचित समाजघटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने लढा देणारे अण्णा मोतीराम साळवे यांनी पंचायत समिती डोंगरन्हावे गणातून उमेदवारीसाठी आपली इच्छा अधिकृतपणे व्यक्त केली आहे. त्यांनी या संदर्भात आमदार किसनजी कथोरे यांच्याकडे उमेदवारीसाठी अर्ज सादर केला आहे.
अण्णा साळवे हे भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चा मुरबाड तालुका अध्यक्ष या पदावर कार्यरत असून, अनेक वर्षांपासून पक्ष संघटनवृद्धीसाठी प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य करत आहेत. प्रशासन आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांचा त्यांनी सखोल अभ्यास केला असून, जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे.
आंबेडकरी विचारसरणीचा ठसा आणि प्रबुद्ध विचारांची दिशा ग्रामीण पातळीवर पोहोचविण्यासाठी साळवे यांनी मोठे योगदान दिले आहे. समाजातील विविध घटकांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध तसेच जनतेत असलेली मजबूत पकड यामुळे त्यांच्या नावाला इच्छुक उमेदवारांच्या यादीत विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
आमदार किसनजी कथोरे यांचे निकटवर्ती व विश्वासू कार्यकर्ते म्हणून अण्णा साळवे यांची ओळख असून, त्यांच्या उमेदवारीकडे पक्ष नेतृत्व सकारात्मक दृष्टीकोनातून पाहील अशी अपेक्षा स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
साळवे यांच्या उमेदवारीला स्थानिक समाजघटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आगामी पंचायत समिती निवडणुकीत त्यांचा प्रभावी ठसा उमटू शकतो, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, या गणातून अखेरीस पक्षश्रेष्ठी कोणाला उमेदवारी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment
0 Comments