वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
कार्यकारी संपादक रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) – दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी.) संभाजीनगर विभागामार्फत आज मुक्कामी असलेल्या चालक-वाहक बांधवांसाठी पारंपरिक अभ्यंगस्नानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात सर्व चालक-वाहकांना उटणे लावून अभ्यंगस्नान घालण्यात आले, तसेच त्यांचा सत्कार फुलांच्या हारांनी करण्यात आला. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत फराळ व मिठाईचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात विभागीय नियंत्रक, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अनेक कर्मचारी उपस्थित होते. यामुळे कामाच्या व्यापातही सणाचा आनंद कर्मचाऱ्यांनी उत्साहात अनुभवला.
महामंडळाच्या या उपक्रमाचे शहरभर कौतुक होत असून, "चालक-वाहक हे वाहतूक व्यवस्थेचे खरे कणा आहेत" असा उल्लेख करून त्यांचा सन्मान करण्याचा हा अभिनव उपक्रम ठरला आहे .


Post a Comment
0 Comments