वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
सोशल मीडिया संपादक मोहनजी दीपक
हिंगोली (नरसी नामदेव) :
मराठी आणि पंजाबी भाषा तसेच संस्कृतीचा सुंदर अनुबंध म्हणजे ‘संत नामदेव घुमान यात्रा’ होय, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. जगदीश कदम यांनी केले.
नानकसाई फाऊंडेशनतर्फे आयोजित संत नामदेव घुमान सद्भावना यात्रेच्या माध्यमातून पंढरीनाथ बोकारे मराठी आणि पंजाबी संस्कृतीला जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी संत नामदेव सद्भावना परिषदेत काढले.
ही परिषद नरसी नामदेव (ता. हिंगोली) येथे नामदेव मंदिरात पार पडली. यावेळी पूजा-अर्चा करून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. नांदेड (हजूरसाहिब) ते अमृतसर व्हाया नरसी नामदेव या मार्गावरून जाणारी ही ११ वी संत नामदेव घुमान यात्रा दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणार आहे.
या कार्यक्रमाला महानुभाव पंथाचे अभ्यासक प्रा. डॉ. संजय जगताप, सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक घारगे, मंदिर संस्थानचे कार्यवाह ह.भ.प. रमेश मगर महाराज नरसीकर, सामाजिक कार्यकर्ते माधवराव पटणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संभाजी धुळगुंडे, प्रा. सुदामराव बोखारे, प्रा. उत्तमराव बोकारे, प्रा. रामदास बोकारे, गोविंद हंबर्डे तसेच नानक साई फाऊंडेशनचे अध्यक्ष व वरिष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे उपस्थित होते.
प्रा. डॉ. जगदीश कदम म्हणाले, “कुठलाही धर्म मानवतेचा असतो. तो समाजांना जोडतो. संत नामदेव यांनी मराठीची पताका पंजाबपर्यंत नेली. नानकसाई फाऊंडेशन दरवर्षी ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर ही ऐतिहासिक यात्रा आयोजित करून त्या परंपरेला जिवंत ठेवते, ही बाब अभिमानास्पद आहे.”
कवी शिवाजी कऱ्हाळे यांनी प्रास्ताविक करून परिषदेच्या आयोजनाविषयी माहिती दिली. प्रा. डॉ. संजय जगताप यांनी ‘नामदेवा रचिला पाया, तुका झाला कळस’ या उक्तीचा संदर्भ देत नामदेवांच्या कार्याचे महत्व स्पष्ट केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक घारगे यांनी नानकसाई फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.
शेवटी घुमान साहित्य सभेचे अध्यक्ष डॉ. गजानन देवकर यांनी आभार प्रदर्शन केले.
या वेळी माधवराव सादलापुरे, शंकरराव कुबडे, ज्ञानेश्वरराव बोखारे, पुंडलिक बेलकर, महेंद्रसिंग पैदल, धनंजय उमरीकर, एम. टी. कदम, दिलीप अंगुलवार, चंद्रकांत पवार, अशोक कंकरे, भास्कर दीक्षित, सचिन शिनगारे, सुरेश रापते, कृष्णा जोशी, जयमाला मामडे, पंडितराव सारंग, जिजाबाई सारंग, ह.भ.प. रमेश महाराज मगर, बद्रीनाथ घोंगडे, केशव भालेराव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments