वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
शहापूर तालुका प्रतिनिधी : शंकरजी गायकवाड .
मुरबाड (ता. मुरबाड, जि. ठाणे)
भारताचे सरन्यायाधीश डॉ. भूषण गवई साहेब यांच्यावर एका मनुवादी प्रवृत्तीच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत आंबेडकर राईट्स वकील संघटना, मुरबाड यांच्या वतीने मुरबाड पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले.
या निवेदनात संघटनेने स्पष्टपणे नमूद केले आहे की, डॉ. गवई साहेब हे देशातील सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असून त्यांनी आपल्या कार्यकाळात संविधानिक मूल्यांचे पालन करत न्यायव्यवस्थेचा सन्मान वाढविला आहे. तथापि, काही संकुचित व जातीय विचारसरणी असलेल्या मनुवादी प्रवृत्तीच्या वकिलांनी त्यांच्यावर अन्यायकारक व अमानवीय हल्ला केला, हा प्रकार देशातील लोकशाही व न्यायव्यवस्थेवरच हल्ला असल्याचे संघटनेचे मत आहे.
संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
> “जर देशातील सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशच मनुवादी मानसिकतेच्या लोकांपासून सुरक्षित नाहीत, तर सामान्य वकिलांची व नागरिकांची काय स्थिती असेल याची कल्पनाच करवत नाही. त्यामुळे अशा प्रवृत्तीवर तात्काळ कठोर कारवाई करून आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे.”
या निषेध निवेदनावर अॅड. सचिन संजय वाघचौरे, अॅड. मदन मधुकर थोरात आणि अॅड. निखील किशन अहिरे यांच्या स्वाक्षऱ्या असून, निवेदनाची प्रत मुरबाड पोलिस ठाण्यात पोलीस अंमलदार यांच्याकडे सादर करण्यात आली आहे.
संघटनेने पुढे अशी मागणीही केली की,
सरन्यायाधीशांवरील हल्ल्याला प्रोत्साहन देणाऱ्यांवर कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी, तसेच सर्व न्यायालयीन परिसरात वकिल व न्यायाधीशांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात.
या घटनेमुळे संपूर्ण समाजात संतापाची लाट उसळली असून, संविधान, न्याय आणि समानतेच्या मूल्यांवर विश्वास असणाऱ्या सर्व नागरिकांनी एकत्र येऊन अशा प्रवृत्तीचा निषेध करणे ही काळाची गरज आहे.
संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अपमान करणाऱ्यांना कायद्याने कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे, अशी जनतेचीही मागणी होत आहे.



Post a Comment
0 Comments