Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

महर्षी वाल्मिकी जयंती मुरबाडमध्ये उत्साहात साजरी..! अखिल भारतीय वाल्मिकी नवयुवक संघाच्या वतीने भव्य आयोजन



वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻

शहापूर तालुका प्रतिनिधी शंकरजी गायकवाड .


मुरबाड : मुरबाड शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे अखिल भारतीय वाल्मिकी नवयुवक संघाच्या वतीने आदिकवी महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात साजरी करण्यात आली. समाजातील एकता, सन्मान आणि ज्ञानाचा संदेश देणाऱ्या या जयंती सोहळ्याला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


कार्यक्रमाची सुरुवात महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या वेळी “रामायण” या महान काव्याचे रचनाकार आणि प्रथम कवि महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी भाषणे सादर करण्यात आली.


या प्रसंगी मुरबाड नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष मोहन सासे, माजी नगरसेवक रवींद्र देसले, सामाजिक कार्यकर्ते सागर चंबावणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दीपक वाघचौरे, मनसेचे अध्यक्ष देवेंद्र जाधव, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष गुरुनाथ पवार, आरपीआयचे उपाध्यक्ष रमेश देसले, तसेच भाजपचे कार्यकर्ते नरेश मोरे आणि विष्णू देवा गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.


या जयंती महोत्सवाचे यशस्वी आयोजन अखिल भारतीय वाल्मिकी नवयुवक संघ महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. आयोजन समितीत तालुका अध्यक्ष शंकरभाई गोहिल, तालुका उपाध्यक्ष तुळशीराम परमार, महासचिव प्रकाश परमार, शहराध्यक्ष किर्ती गोहिल, तसेच विशाल गोहिल, अशोक रील, विष्णू रील, विजय परमार, रोहित चौहान आणि अनिल सुरडकर यांचा उत्साही सहभाग होता.


एकतेचा आणि सामाजिक समरसतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. महर्षी वाल्मिकींच्या आदर्शांवर चालत समाजात समानता, शिक्षण व एकात्मतेचा दीप प्रज्वलित राहावा, हाच या कार्यक्रमाचा मुख्य संदेश होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील थोरात यांनी केले.



Post a Comment

0 Comments