वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
शहापूर तालुका प्रतिनिधी : शंकरजी गायकवाड
कानडी — दिनांक ९/१०/२०२५ रोजी जि. प. शाळा कानडी येथे बदली होऊन गेलेल्या शिक्षकांचा निरोप समारंभ व नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचा स्वागत समारंभ असा दुहेरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. गंगाराम ढमके व श्री. संजय पडवळ सर यांचा निरोप घेण्यात आला तर श्री. भेके सर यांचा स्वागत करण्यात आला.
शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने श्री. रमेश पडवळ सर, वरिष्ठ शिक्षक, तसेच श्री. भेके सर यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले. शिक्षकांप्रति ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून कृतज्ञता व्यक्त केली.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. महेंद्र निमसे यांनी या वेळी आपल्या भाषणात सांगितले की, “दोन वर्षात आमच्या शाळेचा चेहरामोहरा बदलला आहे. विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड निर्माण करून शाळेच्या गुणवत्तेत भर पडली आहे.”
कार्यक्रमाला ग्रामस्थ, तरुण वर्ग व महिला वर्गांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली आणि शिक्षकांप्रती आदर व सन्मान व्यक्त केला.


Post a Comment
0 Comments