वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️
शहापूर (शंकर गायकवाड)
भारतीय बौद्ध महासभा शाखा ठाणे जिल्हा अंतर्गत शहापूर तालुका शाखेच्या वतीने आयोजित ‘वर्षावास सांगता समारंभ 2025’ हा कार्यक्रम सर्व धम्म बांधवांनी दिलेल्या धम्मदानातून अत्यंत उत्साहात व आनंदात संपन्न झाला.
या भव्य समारंभास प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक आदरणीय अमन दादा आंबेडकर (विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू) यांची प्रेरणादायी उपस्थिती लाभली. तसेच आदरणीय विशाल लोंढे साहेब, सहाय्यक उपायुक्त पुणे (अतिरिक्त पदभार बार्टी पुणे) यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमास मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन शहापूर तालुका पुरुष, महिला व शहर कार्यकारिणी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, बौद्ध उपासक-उपासिका, आजी-माजी पदाधिकारी, बौद्धाचार्य, माजी श्रामनेर, केंद्रीय शिक्षक-शिक्षिका तसेच तालुक्यातील सर्व ग्राम शाखांचे प्रतिनिधी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत भव्य, शिस्तबद्ध आणि यशस्वी झाला.
कार्यक्रमाच्या यशात हातभार लावणाऱ्या सर्व धम्मबांधवांचे भारतीय बौद्ध महासभा शहापूर तालुका पुरुष, महिला व शहर कार्यकारिणी तर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.



Post a Comment
0 Comments