वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
प्रतिनिधी:-आनंद भालेराव
रत्नागिरी: नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (NRMU) चे 71वे वार्षिक अधिवेशन 12 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबरदरम्यान रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे भव्यदिव्यात पार पडणार आहे. संपूर्ण मध्य रेल्वे व कोकण रेल्वे मंडळातील कामगारांसाठी दिशा, धोरणे आणि संघटनात्मक एकतेचा नवा अध्याय लिहिणारे हे अधिवेशन म्हणून याकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे.
यंदाच्या अधिवेशनाचे प्रमुख उद्दिष्टे म्हणजे
रेल्वे कामगारांचा आवाज बुलंद करणे,
युनियनची एकजूट दृढ करणे,
असंगठित कामगारांना संघटित करुन त्यांना सामाजिक न्याय मिळवून देणे,
ठेकेदारी व वाढत्या बेरोजगारीविरोधातील संघर्षाला बळ देणे,
कामगारांच्या हक्कांसाठी एकसंघ भूमिका मांडणे.
युनियनच्या विजयसाठी प्रत्येक कामगाराचे एक पाऊल महत्त्वाचे असून, संघटनेच्या सामूहिक शक्तीमुळेच कामगारहिताचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडता येतात, अशी भावना अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त होत आहे.
या अधिवेशनासाठी मार्गदर्शक म्हणून खालील मान्यवरांचे नेतृत्व लाभणार आहे:
काॅ. वेणू पी. नायर, महामंत्री, NRMU
काॅ. शिवगोपाल मिश्रा, महामंत्री, AIRF
काॅ. जे. आर. भोसले, कार्यकारी अध्यक्ष, AIRF
कामगार चळवळीला नवी उमेद देणारे हे अधिवेशन मध्य व कोकण रेल्वे विभागातील सर्व कर्मचारी, पदाधिकारी आणि प्रतिनिधी यांच्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.


Post a Comment
0 Comments