वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
शहापूर तालुका प्रतिनिधी शंकर गायकवाड
शहापूर तालुक्यातील खरपत 1 ग्रामस्थ मंडळाच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या रस्ता व पूल बांधकामाच्या मागणीला अखेर गती मिळाली आहे. पंचायत समितीचे माजी सदस्य काशिनाथ महादू वाख यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे संबंधित विभागाने प्रत्यक्ष सर्वेक्षणास प्रारंभ केला आहे.
या कामासाठी लोकसभा खासदार सुरेश बाळ्या मामा म्हात्रे, मुरबाड विधानसभा आमदार श्री. कथोरे, शहापूर विधानसभा आमदार श्री. दरोडा, तसेच पांडुरंग बरोरा यांची शिफारसपत्रे घेऊन पाठपुरावा करण्यात आला. अखेर संबंधित यंत्रणेने रस्ता आणि पुलासाठी आवश्यक मार्ग निश्चित केला.
PMGSY योजनेचे क्लास-1 अधिकारी खांभाकर साहेब यांनी खरपत येथे रात्री मुक्काम करून पहाटे प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. या पाहणीदरम्यान ग्रामस्थ जैतू उघडा, गोमा मेंगेळ, देऊ मेंगेळ, गणपत शिंदे, जगण शिंदे, पंचायत समिती सदस्य काशिनाथ वाख, सावरोली (सो.) चे सरपंच मधुकर निरगुडा तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
खरपत ग्रामस्थांनी या उपक्रमाबद्दल खासदार आणि आमदारांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. आगामी काळात रस्ता व पुलाचे काम सुरू झाल्यानंतर परिसरातील वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे.



Post a Comment
0 Comments