वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
ठाणे जिल्हा प्रतिनिधी मनोहर गायकवाड .
बदलापूर (ठाणे) – ठाणे जिल्ह्यात विवाहबाह्य संबंधातून घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरला आहे. बदलापूर पश्चिम येथे एका महिलेने आपल्या प्रियकरासह पतीची गळा दाबून हत्या करून मृतदेह उल्हास नदीत फेकल्याचा गुन्हा उघडकीस आला आहे. ही घटना 7 नोव्हेंबर 2025 रोजी मध्यरात्री घडली असून, पोलिसांनी पुढील दिवशी दोघांना अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, किसन परमार (वय 44) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. किसन परमार हा पत्नी मनीषा परमार आणि तीन मुलांसह बदलापूर पश्चिम येथे राहत होता. कामानिमित्त तो वारंवार बाहेर जात असल्यामुळे त्याच्या गैरहजेरीत पत्नी मनीषाचे त्याच इमारतीत राहणाऱ्या लक्ष्मण भोईर (वय 36) या विवाहित तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले.
काही दिवसांपूर्वी किसनला पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाची माहिती मिळाल्यानंतर त्याने मनीषाला जाब विचारला. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. अखेर हा वाद जीवघेणा ठरला.
7 नोव्हेंबरच्या मध्यरात्री किसन झोपेत असताना मनीषा आणि तिच्या प्रियकर लक्ष्मण भोईर यांनी दोरीने त्याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह गोधडीत गुंडाळून बाईकवरून वालिवली पुलाजवळील उल्हास नदीत फेकून आरोपी दोघेही घटनास्थळावरून फरार झाले.
किसन परमार बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि प्राथमिक चौकशीतून दोघांच्या हालचालींवर संशय आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. पुढील तपास सुरू आहे.


Post a Comment
0 Comments