वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
सोशल मीडिया संपादक मोहन दिपके
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत आणि कळमनुरी या तिन्ही नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक आज दिनांक ८ नोव्हेंबर २०२५, शनिवार रोजी वसमत येथे आयोजित करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षस्थान महाविकास आघाडीचे जिल्हा समन्वयक तथा माजी सहकार मंत्री मा. जयप्रकाश दांडेगावकर यांनी भूषविले.
बैठकीत काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले. या वेळी हिंगोली जिल्ह्यातील आगामी तिन्ही नगरपालिका निवडणुका महाविकास आघाडी एकजुटीने आणि पूर्ण ताकदीने लढविण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांची निवड मोठ्या ताकदीने करून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस माजी आमदार डॉ. संतोष टारफे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशअप्पा सराफ, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपू पाटील, संदेश देशमुख, ॲड. जकी कुरेशी, हाफीज भाई, विनायक भिसे, विनायक देशमुख, बाळासाहेब मगर, ॲड. रवि शिंदे, सुनील काळे, डॉ. पार्डीकर, ॲड. ऋषिकेश देशमुख, मुजीब पठाण यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments