Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

बेरूळा येथील निळ्या ध्वजाचा अवमान प्रकरण; डिग्रस फाटा येथे भीमसैनिकांचा रास्ता रोको आंदोलन




वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️

सोशल मीडिया संपादक मोहन दीपके

हिंगोली जिल्ह्यातील बेरूळा येथे निळ्या ध्वजाचा अवमान झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील निळा ध्वज पोलीस प्रशासन आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही नोटीस न देता, अतिबळाचा वापर करत जेसीबीद्वारे काढून टाकल्याचा आरोप स्थानिक भीमसैनिकांनी केला आहे. या प्रकरणात संबंधित पोलीस अधिकारी व प्रशासकीय कर्मचाऱ्यांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी सातत्याने होत आहे.


याच मागणीसाठी बेरूळा येथील सर्व बौद्ध उपासक-उपासिका आणि भीमसैनिकांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे लॉंग मार्च आणि धरणे आंदोलन करण्यात आले होते. प्रशासनाने लिखित दिलासाही दिला; परंतु प्रत्यक्षात कोणतीही कारवाई न झाल्याने नाराज नागरिकांनी 2 ऑक्टोबर 2025 पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले.



अंदोलनादरम्यान नऊ आंदोलनकर्त्या महिलांची प्रकृती गंभीर बिघडल्याने त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगोली येथे हलविण्यात आले. तरीही आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ठाम असून, "निळा ध्वज पूर्ववत लावला जाईपर्यंत आणि चौकाला अधिकृतरीत्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक घोषित केले जाईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही," असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.


प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सुमेध कुऱ्हे, रोहित इंगोले, सिद्धार्थ कुऱ्हे तसेच डिग्रस येथील भीमसैनिक व बौद्ध उपासकांनी डिग्रस फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले.



या आंदोलनात रिपब्लिकन नेते दिनेश हनुमंते, नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (NDMJ) चे जिल्हा अध्यक्ष मोहन मदन दिपके, दीपक फोले, राजू कुऱ्हे, वैभव धबडगे, दिनाजी खाडे, राहुल घोडके, काशिनाथ गायकवाड, बाबुराव कुऱ्हे, बबन कुऱ्हे आणि विविध सामाजिक कार्यकर्ते तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.





Post a Comment

0 Comments