वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
सोशल मीडिया संपादक मोहन दिपके
दिग्रस/कऱ्हाळे (ता. औंढा, जि. हिंगोली)
विद्यार्थी दिनानिमित्त मनी वाईज वित्तीय साक्षरता सेंटर हिंगोलीतर्फे दिग्रस व कऱ्हाळे गावातील नालंदा बौद्ध विहार येथे वित्तीय साक्षरता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 07 नोव्हेंबर 1900 रोजी सातारा येथील गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये (सध्याचे प्रतापसिंह हायस्कूल) प्रथम इंग्रजी इयत्तेत प्रवेश घेतला होता. त्या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधत 2017 पासून भारत सरकार हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करत आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डीईए फंडांतर्गत व क्रिसील फाउंडेशनच्या सहकार्याने सुरू असलेल्या मनी वाईज वित्तीय साक्षरता केंद्र हिंगोली मार्फत आर्थिक साक्षरता शिबिर घेण्यात आले. या शिबिरात औंढा तालुका क्षेत्र समन्वयक करण कुऱ्हे यांनी आर्थिक नियोजन, बचत, गुंतवणूक, बँकिंग सेवा, विविध सरकारी योजना, कर्ज व लोन प्रक्रिया, विमा योजना आणि पेन्शन व्यवस्थेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
शिबिराच्या माध्यमातून लहान मुलांना वह्या व पेनचे वाटपही करण्यात आले. कार्यक्रमाला रिपब्लिकन नेते दिनेश हनुमंते, समगा येथील सरपंच सिद्धार्थ इंगळे, शाहीर शेषराव कुऱ्हे, वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू मेसाजी कुऱ्हे, सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ बाबुराव कुऱ्हे तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
मनी वाईज वित्तीय साक्षरता सेंटर हे राजीव बोबडे, देविदास शिंदे, प्रीतम निनावे, सत्यपाल चक्रे, प्रभाकर शिंदे, सविता निपाणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच केंद्र व्यवस्थापक दिपक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे.



Post a Comment
0 Comments