Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

“मंत्री प्रताप सरनाईकांनी दोनशे कोटींची जमीन तीन कोटींमध्ये लाटली” – विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक आरोप



वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️

ठाणे जिल्हा प्रतिनिधी मनोहर गायकवाड


नागपूर : महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांकडून जमिनीचे व्यवहार व बळकावण्याच्या आरोपांची मालिका अखंड सुरू असताना आता राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विरोधात नवा गंभीर आरोप समोर आला आहे. काँग्रेस नेते व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरनाईक यांनी तब्बल २०० कोटी रुपये किंमतीची जमीन केवळ ३ कोटी रुपयांत घेतल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या दाव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे.


यापूर्वी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या जमिनीशी संबंधित व्यवहारांवरही प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामध्येच या नव्या प्रकरणामुळे सरकारवर ‘जमिनी लाटण्याचा उद्योग’ चालवल्याचा आरोप काँग्रेसकडून जोरदारपणे केला जात आहे.


या आरोपांवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की,

“वडेट्टीवार फक्त माध्यमांसमोर बोलतात. त्यांनी माझ्याकडे अधिकृत तक्रार दिल्यास या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. आरोप करून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा त्यांनी ठोस पुरावे सादर करावेत.”


दरम्यान, वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, “आओ लुटो महाराष्ट्र बेचो” हा त्यांचा टोला ट्रेंडमध्ये आला आहे. काँग्रेसने या प्रकरणावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला असताना, भाजप-शिंदे गटाने मात्र हे सर्व आरोप निव्वळ राजकीय हेतूने केल्याचे प्रतिपादन केले आहे.




Post a Comment

0 Comments