वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️
वासिंद |गणेश अहिरे
भीमा कोरेगाव विजयस्तंभ बचाव समितीचे संस्थापक अध्यक्ष व मार्गदर्शक ऍड. दादाभाऊ साहेब अभंग यांचे आगमन येत्या शुक्रवार, दि. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सायं. ६ वा. श्रावस्ती बौद्धविहार, वासिंद (पूर्व) येथे होणार आहे. त्यांच्या आगमनापूर्वी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आयु. संतोषजी कर्डक (शहापूर तालुका अध्यक्ष), आयु. लकी जाधव (शहापूर तालुका सचिव) आणि आयु. नितीनजी पवार यांच्या नेतृत्वाखाली वासिंद येथील साईरचना अपार्टमेंट येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
कार्यक्रमानिमित्त आलेल्या मान्यवरांचे लकी जाधव यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. बैठकीदरम्यान २१ नोव्हेंबर रोजीच्या कार्यक्रमाचे नियोजन कसे असावे यावर सविस्तर चर्चा झाली. याच वेळी ऍड. दादाभाऊ अभंग यांनी व्हिडिओ कॉलद्वारे मार्गदर्शन केले.
बैठकीत आगामी कार्यक्रमात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले, तसेच या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.
या बैठकीत वासिंद शहरातील तरुण वर्गाने उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली. तसेच वासिंद येथील कलाकार, विद्रोही कवी गणेश आहिरे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वाघमारे, किरण जाधव, मारुती कांबळे, जयवंत साबळे, विशाल पगारे, गणेश शिंदे, विशाल आहिरे, ऋतिक धनगर आदी मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती.



Post a Comment
0 Comments