वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
मोहन दिपके
आज दि.18/11/25 रोजी अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील असल्याने शासनामार्फत उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांतील आर्थिक सहाय्य कायदेशीरदृष्ट्या अपेक्षित आहे.
परंतु, सदर कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याकडून अत्यंत गंभीर स्वरूपाचे अनियमित व्यवहार होत असल्याचे दिसून आले आहे.
*तक्रारीचा मुख्य मुद्दा* :
1. काही पिढीत व्यक्तींनी चिरीमिरी / पैशांची देवाणघेवाण संबंधित अधिकाऱ्यास दिल्यानंतर त्यांना ॲट्रॉसिटी कलमानुसार व इतर योजनांतील योग्य अर्थसहाय्य मंजूर केले जात आहे.
2. परंतु ज्यांनी कोणतीही देवाणघेवाण केली नाही, अशा पात्र व्यक्तींना
कलमानुसार मिळणारे अर्थसहाय्य मुद्दाम
चुकीच्या पद्धतीने गुन्ह्याचे स्वरूप कमी करून,
अथवा अन्य अप्रस्तुत कारणे दाखवत
सहाय्य नाकारण्यात / रोखण्यात / उशीर करण्यात येत आहे.
3. ही कारवाई केवळ अन्यायकारकच नाही, तर
SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायदा, 1989,
राज्यघटना कलम 15(4), 16(4), 46
तसेच
प्रशासनातील नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे
स्पष्ट उल्लंघन आहे.
*भीमशक्ती ची मागणी* :
1. संबंधित अधिकाऱ्याची तात्काळ चौकशी करण्यात यावी.
2. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांची स्थलांतर (बदली) / निलंबनासारखी प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.
3. ज्यांचे अर्थसहाय्य चुकीच्या पद्धतीने रोखले गेले आहे, त्यांचे प्रकरणे पुनर्तपासून कलमानुसार लाभ त्वरित मंजूर करण्यात यावेत.
4. अशा अनियमिततेस जबाबदार अधिकारी/कर्मचाऱ्यांवर योग्य शिस्तभंग व कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निवेदन सहायक समाजकल्याण अधिकारी हिंगोली यांना निवेदन देण्यात आले. सदरील हा अफरा तफरीचा प्रकार नाही थांबवला तर भीमशक्ती च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला त्या प्रसंगी भीमशक्ती चे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुलदीपके,दिनेशजी हनुमंते,काशिनाथ गायकवाड,सुमित कुऱ्हे,रोहित इंगोले, प्रकाश मगरे, बाळासाहेब कदम आदी उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments